Saturday, 16 June 2012

Funny Marathi Joke एका सरदारजीला एका माणसाने सांगितलं,

एका सरदारजीला एका माणसाने सांगितलं, "आज दुपारी बारा वाजता तुला कोणीतरी फसवणार आहे." सरदारजी म्हणाला, "शक्यच नाही ! आज मी मुळी घरीच राहणार नाही. मी संपूर्ण दिवस माझ्या मित्राच्या घरी जाऊन राहिन."

सरदार सकाळपासून मित्राच्या घरी गेला. दुपारचे बारा वाजत आले. सरदार खूश झाला. बारा वाजायला एक मिनिट बाकी असताना एक माणूस धापा टाकत आला आणि त्याला म्हणाला, " लवकर घरी चल. तुझ्या घराला आग लागली आहे आणि तुझी बायको आणि मुलं त्यात जळून खाक झाली आहेत !"

सरदार घाबरला. तो धावतच घरी गेला. घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपलं लग्नच झालं नाहीये !!!

No comments:

Post a Comment